a person drowns underwater
a person drowns underwater

श्रद्धा आणि विश्वास: फरक आणि समानता !
श्रद्धा आणि विश्वास हे दोन शब्द अनेकदा समानार्थी वापरले जातात. परंतु, त्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे. श्रद्धा म्हणजे काहीतरी किंवा कोणावर दृढ आत्मविश्वास ठेवणे, तर विश्वास म्हणजे एखाद्या गोष्टीवर पूर्णपणे आधारित असलेला विचार किंवा धारणा. देवावर श्रद्धा ठेवता येते, पण देवावर विश्वास ठेवणं प्रत्येकासाठी सहज नसतं. ही दोन्ही भावनाएं अनुभवांवर आणि वैयक्तिक विचारांवर आधारित असतात.

बालपणातील अनुभव आणि देव !

लहानपणी आपले जग म्हणजे आपले आई-वडील असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला आश्चर्य आणि जिज्ञासा असते. जसजसे आपण मोठे होतो, तसतसे आपल्याला देवाचे अस्तित्व आणि त्याचा महत्त्व कळू लागतो. आपल्या आई-वडिलांना देवाची पूजा करताना पाहून आपल्याला वाटतं की देव आपल्या आई-वडिलांपेक्षा ही मोठा आहे. पुढे जाऊन जेव्हा आपल्याला कळतं की संपूर्ण जग देवाला पुजते, तेव्हा आपल्याला देव ही अत्यंत मोठी आणि अदृश्य शक्ती आहे असं वाटतं.

प्रत्येकाने आपापल्या परीने देव बनवला !

प्रत्येकाने आपापल्या परीने देव बनवला आहे. कोणाचा देव हवेत उडतो, तर कोणाचा देव पाण्यात पोहतो. कोणाचा देव सुळावर चढतो, तर कोणाचा देव मास मच्छी मटण खातो. कोणाचा देव नुसता भाजीपाला खातो, तर कोणाचा देव डोळे मिटून बसतो. कोणाचा देव नुसता तांडव करतो, तर काही देवांना टोपी घातलेली आवडते. काही देवांना केस वाढवलेले आवडतात. कोणाचा देव जमिनीवर सुख देतो, तर कोणाचा देव जन्नत मध्ये आनंद देतो. माणसाला माहित असलेल्या प्रत्येक रूपात माणसाने देव बनवला आहे. आपल्या कल्पनेच्या ताकदीने देव घडत गेला. एका वाक्यात सांगायचं झालं तर देव ही मानवाने ठरवलेली भूमिका आहे, जी प्रत्येकाला स्वतःपेक्षा मोठी वाटते.

आस्तिक आणि नास्तिक!

आस्तिक आणि नास्तिक यांच्या विषयी बोलायचे झाले तर आस्तिक आणि नास्तिक दोघेही मूर्ख असू शकतात, जर ते आपल्या श्रद्धेच्या किंवा अविश्वासाच्या आधारावर दुसऱ्यांना न्यायत असतील. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, त्या गोष्टीवर विश्वास ठेवणारे आस्तिक मूर्ख, आणि ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, त्या गोष्टीवर विश्वास न ठेवणारे नास्तिकही मूर्ख! देवाविषयी आपल्याला काहीच ठोस माहिती नसताना, त्यावर विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं हे दोन्ही तितकंच अप्रगत आणि अंधश्रद्धाजन्य असू शकतं. आपल्या अनुभवांच्या आधारे विचार करणे आणि निर्णय घेणे अधिक तर्कसंगत आहे.

देवाची अनुभूती !

प्रत्यक्ष देव कधीही दिसू शकत नाही, त्याला कागदावर रेखाटता येत नाही. देव ही अनुभूतीची गोष्ट आहे. जिथे निर्माण आहे तिथे निर्माता असतोच. डोळ्याने दिसणारा देव म्हणजे निसर्ग. ऊन, पाऊस, दगड, नदी, डोंगर, झाडे, फुले आणि पाणी हे सर्व निसर्गाच्या निर्मितीचे परिणाम आहेत. त्यामुळे माझा देव निसर्ग आहे, आणि त्यावर माझा दृढ विश्वास आहे. निसर्गाच्या शक्ती आणि सुंदरतेमध्ये देवाची अनुभूती घेणे हे खरे आध्यात्म आहे.

निष्कर्ष !

देवाचा खरा अर्थ शोधायचा असेल तर निसर्गाचा साक्षात्कार करायला हवा. निसर्गाचं महत्त्व समजून घेतलं, तर देवाच्या अस्तित्वाची अनुभूती आपोआपच येईल. देव ही मानवाने ठरवलेली भूमिका आहे, जी प्रत्येकाला स्वतःपेक्षा मोठी वाटते. म्हणून, देवाला शोधायचं असेल तर निसर्गाकडे वळा, कारण तोच आपला खरा देव आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकात, त्याच्या प्रत्येक कृतीत देवाची अनुभूती घेता येईल. म्हणूनच, निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Blogger : Sagar R. Pawar

देवाच्या स्वरूपाचा शोध:

श्रद्धा, विश्वास आणि निसर्ग

देवाच्या अस्तित्वाविषयी चर्चा अनेक शतकांपासून चालू आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एका टप्प्यावर असा प्रश्न येतो: देव खरोखर आहे का? देवाविषयी अनेक मते असतात, आणि त्यामागे अनेक तत्त्वज्ञान आणि धर्म आहेत. पण देव म्हणजे नेमकं काय? यावर एक विचारमंथन करूया.